राहत्या घरातून युवती बेपत्ता
राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास सातारा शहरा नजीकच्या उपनगरात राहणारी एक 21 वर्षीय युवती राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.