डी-मार्ट परिसरात आढळला एकाचा मृतदेह
डी-मार्ट परिसरात एकाचा मृतदेह आढळला असल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : डी-मार्ट परिसरात एकाचा मृतदेह आढळला असल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा शहरालगत डी-मार्ट परिसरात शुक्रवारी शंभू तांबोळी (वय 37, रा.पिंपवळे ता.माण) या व्यक्तीचा मृतदेह आढळला. सातारा तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर ओळख पटली. मृतकाचे कुटुंबिय सांयकाळी उशीरा पोहचल्यानंतर ओळख पटली. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर समजणार आहे.