अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा
अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी चार चाकी चालकावर विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी चार चाकी चालकावर विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, थार चारचाकी गाडीची (एमएच ११ डीयू ३८७५) सायकलला समोर धडक बसल्याने दोघेजण जखमी झाले. शाहूपुरीतील गेंडामाळ कब्रस्तानच्या गेटसमोरील आकाशवाणी झोपडपट्टी येथे दि. २० रोजी घटना घडली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात श्रीकांत बाळकृष्ण जगदाळे (वय ३६, रा. तामजाईनगर, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार माने करत आहेत.