अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई
अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातारा : अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास साबळेवाडी तालुका सातारा येथे तेथीलच भीमराव प्रल्हाद साबळे हा अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ९६० रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.