सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी
सातारा शहरातून अज्ञात चोरट्याने दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा : सातारा शहरातून अज्ञात चोरट्याने दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ९ रोजी रात्री नऊ ते साडेनऊ दरम्यान राधिका रोडवरील नंदादीप हॉस्पिटल च्या परिसरात पार्क केलेली मयूर संपत सोनवणे रा. विरमाडे, ता. वाई, जि. सातारा यांची दुचाकी क्र. एमएच ११ बीएम ५५६२ अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार काटकर करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 14 रोजी सकाळी साडेसहा ते साडेदहा दरम्यान बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली पार्क केलेली राहुल जयवंत तांबेकर रा. कर्मवीर सोसायटी, सातारा यांची दुचाकी क्र. एमएच ११ बीबी ४२१३ अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.