युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड ते सातारा एसटी बसमध्ये प्रवासावेळी राजेंद्र रसाळ याने युवतीचा दोनवेळा विनयभंग केला. या घटनेने युवती घाबरली व घडलेल्या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन पोलिसांनी त्याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ही घटना दि. 23 सप्टेबर रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.