सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी 20 जणांवर गुन्हा
जिहे, ता. सातारा येथे लाउडस्पीकर लावण्याच्या कारणातून वादावादी, नंतर दोन गटात भांडणे होवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सातारा : जिहे, ता. सातारा येथे लाउडस्पीकर लावण्याच्या कारणातून वादावादी, नंतर दोन गटात भांडणे होवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरज गायकवाड, संतोष फडतरे, शुभम फडतरे, नारायण फडतरे, महेश फडतरे, हणमंत गोरे, सागर गोरे, हणमंत माने, अशोक माने, दादासो माने यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हाेमगार्ड करण मोरे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. २५ सप्टेबर रोजी जिहे येथे घडली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.