अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलगी आहे हे माहित असतानाही पंकज पिंटू चव्हाण (रा.सोलापूर) याने मुलीवर अत्याचार करुन तिला गरोदर केले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना जून 2025 मध्ये सातारा तालुक्यातील एका गावात घडली आहे. मुलगी गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर करीत आहेत.