राहत्या घरातून महिला बेपत्ता
राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सातारा शहरात राहणारी एक महिला बँकेतून पैसे काढून येते, असे घरी सांगून निघून गेली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करत आहेत.