महामार्गावर भरधाव ट्रकची कारला धडक
शिवराज चौकातील कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिजवर भरधाव ट्रकने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे.
सातारा : शिवराज चौकातील कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिजवर भरधाव ट्रकने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात स्विफ्ट कारचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
ट्रक क्रमांक (डी.डी. ०१ वाय ९९०४) ने स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालक अशोक दिलीप जाधव (वय ४२, रा. गोळेश्वर, कराड) हे सुदैवाने जखमी झाले नाहीत. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या घटनेबाबत अशोक जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रक चालकाविरोधात अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.