मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी
मारहाण प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा : मारहाण प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास रानमळा, दौलत नगर सातारा येथे शिवरीचा पाला सोयाबीनच्या शेतात पाडून नुकसान केल्याप्रकरणी जाब विचारला असता नवनाथ मारुती पवार रा. रानमळा, दौलत नगर, सातारा यांना योगेश गणेश मोरे, योगेश यांची पत्नी (नाव माहीत नाही) रा. माजगावकर माळ झोपडपट्टी, सातारा यांनी दांडक्याने मारहाण केल्याची तक्रार नवनाथ मारुती पवार यांनी दाखल केली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार बागवान करीत आहेत.
दुसरी तक्रार योगेश मोरे रा. माजगावकर झोपडपट्टी सातारा यांनी सुरज नवनाथ पवार नवनाथ मारुती पवार नवनाथ यांची पत्नी (नाव माहीत नाही) सर्व रा. रानमळा, दौलत नगर, सातारा यांच्या विरोधात दिली आहे. फिर्यादीनुसार मोरे यांच्यासह त्यांची पत्नी व मुले यांनाही संबंधितांनी मारहाण केली आहे. अधिक तपास महिला सहाय्यक फौजदार मोहोड करीत आहेत.