संशयास्पद वस्तू बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा
संशयास्पद वस्तू बाळगल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : संशयास्पद वस्तू बाळगल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाटा येथे दि.2 रोजी दुपारी बारा वाजता नागेश हनुमंत शिंदे (वय 31 रा.लोकमान्यनगर कोल्हापूर) याच्याकडे मोपेड आढळून आली. त्याची त्याला मालकी सांगता आली नाही. म्हणून त्याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे यांनी गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास हवालदार देशमुख हे करत आहेत.