'त्या' अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा
डिव्हायडर ला कार धडकवून अपघात केल्याप्रकरणी कार चालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : डिव्हायडर ला कार धडकवून अपघात केल्याप्रकरणी कार चालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास शाहू चौक ते पोवई नाका रस्त्यावरील सयाजीराव हायस्कूल समोर असणाऱ्या डिव्हायडरला कार भरधाव वेगात चालवून धडकवून कार मधील सागर गाडे रा. गुरुवार पेठ सातारा, शुभम पवार रा. करंजे पेठ सातारा यांना, तसेच स्वतःला दुखापत करण्यास याचबरोबर डिव्हायडरच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी साहिल जमादार रा. बुधवार नाका, सातारा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.