वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी 7 ते 8 जणांवर गुन्हा
वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी 7 ते 8 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी 7 ते 8 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सार्वजनिक वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक शेडगे (रा. मंगळवार पेठ), बाळासाहेब खरात (रा. कोडोली), प्रकाश खरात (रा.दिव्यनगरी) यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.