जुगार प्रकरणी एकावर कारवाई
जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २१ रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास जैनुद्दीन मकबुल सय्यद रा. काशीळ, ता. सातारा हे सातारा शहरातील सदरबझार-कूपर कॉलनी रस्त्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून ४१० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.