लोखंडी पाईपची चोरी
लोखंडी पाईपची चोरी अज्ञात चोरट्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : लोखंडी पाईपची चोरी अज्ञात चोरट्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी संध्याकाळी 7 वाजता बॉम्बे रेस्टॉरंट सर्व्हिस रोड कडेला, कायनेटिक लुना कंपनीच्या समोर असलेल्या 42 हजार रुपये किमतीच्या सात लोखंडी पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.