अल्पवयीन मुलीचे अपहरण
सातारा शहरातून अज्ञाताने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : सातारा शहरातून अज्ञाताने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून 17 वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ही घटना दि. 16 सप्टेबर रोजी घडली असून मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.