आदेशाचे उल्लंघन प्रकरणी एकावर गुन्हा
तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रतापसिंहनगर येथे दि.1 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पोलीस अधीक्षक यांनी तडीपार केलेला अविनाश राजाराम भिसे वय 35, रा. प्रतापसिंहनगर हा आढळून आला. त्यावरून त्याच्या विरुद्ध तडीपारच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात हवालदार निलेश जाधव यांनी दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार कदम करत आहेत.