सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा
सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तेहसीन अश्फाक शेख राहणार करंजी तालुका सातारा या एसटी बसच्या महिला वाहक सातारा-वेणेखोल प्रवासी बस घेऊन जात असताना अजय विश्वनाथ साळुंखे रा. पिलानेवाडी, आसनगाव, ता. सातारा याने शेख यांच्याशी असभ्य वर्तन करून त्यांना शिवीगाळ, मारहाण केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोरपडे करीत आहेत.