प्रवासादरम्यान तीन तोळे वजनाच्या दागिन्यांची चोरी
प्रवासादरम्यान तीन तोळे वजनाच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : प्रवासादरम्यान तीन तोळे वजनाच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक ते अतित, ता. सातारा असा ट्रॅव्हल्स ने प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधील दोन तोळ्याच्या वजनाचे सोन्याचे गंठण व १ तोळे वजनाचे मंगळसूत्र अज्ञाताने चोरले. हा प्रकार दि. १८ रोजी रात्री ८.३० ते दि. १९ रोजी पहाटे ५.१५ च्या सुमारास बस प्रवासात घडला. या प्रकरणी सौ. माधुरी सचिन यादव (वय ३७, सध्या रा. नाशिक, मूळ रा. अतित, ता. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.