जैतापूर येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन परप्रांतीयाची आत्महत्या
सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत जैतापूर येथे शिव नावाच्या शिवारात ओझर डोहकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला विकास भोला भारद्वाज (वय 29 राहणार रामपूर ता. मधुबन जि.उत्तर प्रदेश) यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सातारा : सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत जैतापूर येथे शिव नावाच्या शिवारात ओझर डोहकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला विकास भोला भारद्वाज (वय 29 राहणार रामपूर ता. मधुबन जि.उत्तर प्रदेश) यांनी लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दिनांक १२ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली असून सुभाष आत्माराम चव्हाण (वय ५५) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करत आहेत.