संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणात आरोपींना मोक्का, मनोज जरांगे यांची मोठी मागणी काय?
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आठ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. या निर्णयामुळे आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला असून आरोपींना जामिन मिळणे देखील कठीण होणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण केल्याच्या प्रकरणात राज्य सरकारने अखेर आठ आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता सर्व आरोपींवर विशेष न्यायालयात खटला चालविण्यात येणार असून त्यांना कठोर शिक्षेची तरतूद या मोक्का कायद्यात आहेत. त्यामुळे या प्रकरणात मोक्का लावण्यात आल्याने प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याच्यावर देखील मोक्का कलम लागू होऊ शकते असे म्हटले जात आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाचे मोठी मागणी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याच्या निर्घृण हत्येला महिना झाला असताना या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या संदर्भात मराठा नेते मनोज जरांगे यांनी मोठी मागणी केली आहे. जरांगे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांच्या कुटुंबाला शब्द दिला आहे. सर्वांना मोक्का लावणा असे त्यांनी स्पष्ट केले होते. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालणार आहे. सर्वांना फासावर लटकवणार, कुणालाही सोडणार नाही, मग आमची फक्त मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे.
जरांगे पुढे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी राज्यात धनंजय मुंडेंनी पसरवलेल्या गुंडगिरीच्या नेटवर्कचा नायनाट करावा. हे बलात्कार करतात, दरोडे टाकतात, हे खून करतात, हे हत्येचा प्रयत्न करतात, सरकारी मलिदा खातात, कुणाच्या जमिनी, कुणाचे प्लॉट लुबाडतात. अंतरवलीतही परळीपासून ते मुंबईपर्यंतच्या तक्रारी येत आहे. फडणवीस यांनी खंडणी आणि खून करणाऱ्यांच्या या साखळीला कलम ३०२ मध्ये फडणवीस यांनी गुन्हा दाखल करावा असे जरांगे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणातील आता जे खंडणीचे आरोपी