जुगार प्रकरणी दोन जणांवर कारवाई
जुगार प्रकरणी सातारा पोलिसांनी दोन जणांवर कारवाई केली आहे.
सातारा : जुगार प्रकरणी सातारा पोलिसांनी दोन जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १० रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास समर्थ मंदिर परिसरातील गणेश मंदिराच्या पाठीमागील अडोशास जुगार घेताना प्रसन्न कुमार कृष्णा विभुते रा. दुर्गा पेठ, सातारा आढळून आले. त्यांच्याकडून ६९० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
दुसऱ्या कारवाईत, खेड गावच्या कमानीजवळ असणाऱ्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला संजय नामदेव घाडगे रा. कृष्णानगर, सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून ४२० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.