सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी
सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरुन नेल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
सातारा : सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरुन नेल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाटा, ता.सातारा येथून अज्ञात चोरट्याने एमएच ११ सीएस ३४६५ या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. २१ सप्टबेर रोजी घडली आहे. याप्रकरणी प्रवीण शामराव पवार (वय ३६, रा. सनपाने ता.जावली) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार हिरवे करीत आहेत.
दुसरी तक्रार संजय शंकर कदम (वय ३८, रा. विलासपूर, गोडोली) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. दि. १७ ते १९ सप्टेबर या कालावधीत अज्ञात चोरट्याने एमएच ११ सीए ०६३० या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी संजय शंकर कदम (वय ३८, रा. विलासपूर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.