सातारा शहरासह तालुक्यातून चार जण बेपत्ता
वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरासह तालुक्यातून चार जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा : वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 रोजी स्वप्नाली विक्रम नागरे रा. गडकर आळी, सातारा ही विवाहिता त्यांची मुलगी वीरा विक्रम नांगरे यांच्यासह राहत्या घरातून निघून गेली आहे.
दुसऱ्या घटनेत, दि. 28 सप्टेंबर रोजी रोहित संजय उगलमोगले रा. संभाजीनगर सातारा हा राहत्या घरातून ब्लॅकबेरी ट्रेनिंग सेंटर नाशिक येथे जातो, असे सांगून निघून गेला आहे.
तिसऱ्या घटनेत, समर्थ मंदिर परिसरात राहणारी २२ वर्षीय युवती घरातून कामावर जाते असे सांगून निघून गेली आहे.