जिल्हा न्यायालयाच्या आवारात भांडण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा
येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात भांडण करणाऱ्या पाच जणांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात भांडण करणाऱ्या पाच जणांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सहाय्यक पोलीस फौजदार शंकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.1 रोजी दुपारी पावणे दोन वाजता अमीर मुजावर, अमीर शेख, अबू भिसे (तिघे रा. पिरवाडी), सागर सपकाळ (रा. आंबेदरे रोड), देवेंद्र ढोणे (रा. ढोणे कॉलनी) हे एकमेकांसोबत भांडण करत होते. तेव्हा त्यांचे भांडण चव्हाण हे सोडवत असतानाही ते ऐकत नव्हते, त्यावरून चौघांच्या विरुद्ध शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.