अपघातातील जखमीचा मृत्यू
अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ रोजी गोडोली नाका येथे राजेंद्र विष्णू कुंभार रा. देगाव फाटा, सातारा यांचा अपघात झाल्याने त्यांना सातारा हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले होते. मात्र दि. ११ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार इंगवले करीत आहेत.