पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेची फसवणूक
पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‘हम स्कॉट डिपार्टमेंट से है. तुमने इतना सोना क्यू पहना है,’ असे म्हणत अनोळखी दोघांनी महिलेचे 70 हजार रुपयांचे दागिने घेवून फसवणूक केली. ही घटना सातारा सातार्यातील जुनी एमआयडीसी येथे घडली आहे. अनिता दिलीप जगताप (वय 57, रा. एमआयडीसी परिसर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 25 सप्टेबर रोजी घडली आहे. चोरट्यांनी महिलेची सोन्याची चेन पुडीत बांधून देतो, असे सांगून फसवणूक केली.