अपघातातील जखमीचा मृत्यू
अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी विनायक शंकरराव तांदळे रा. गोडोली, सातारा यांचा गाडीवरून घसरून अपघात झाला होता. उपचारादरम्यान दि. 19 रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.