नुकसान प्रकरणी अज्ञातावर गुन्हा
दुकानातील सामानाचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : दुकानातील सामानाचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हॉटेल राधिका पॅलेस येथे एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या वेळी तिथेच असलेल्या गायत्री सेल्स या प्लंबिंग साहित्याच्या दुकानाला आग लागू शकते, हे माहिती असतानाही कार्यक्रमातील अज्ञाताने गायत्री सेल्स दुकानासमोरील रस्त्यावर फटाक्यांची माळ लावली. त्यामुळे दुकानाला आग लागून सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाल्याची फिर्याद दुकानाचे मालक अरुणकुमार जेठालाल पटेल रा. संगम माहुली, ता. सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.