सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करुन शांततेचा भंग केल्याप्रकरणी ५ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करुन शांततेचा भंग केल्याप्रकरणी ५ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौरभ पोपट मंडलिक, प्रकाश राजेंद्र शेडगे, आप्पा भवाळ, अनिकेत बापू गायकवाड, मनिष सुभाष पवार (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांच्या विरुध्द पोलीस विकास मोरे यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. ४ ऑक्टोबर रोजी विकासनगर येथे घडली आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून संशयित आरडाओरडा करत होते. यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.