विहिरीत आढळला अनोळखी मृतदेह
ठक्कर सिटीच्या जवळ असलेल्या विहिरीत अज्ञाताचा मृतदेह आढळल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : ठक्कर सिटीच्या जवळ असलेल्या विहिरीत अज्ञाताचा मृतदेह आढळल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ठक्कर सिटीच्या जवळ असलेल्या विहिरीत दि.1 रोजी सायंकाळी सहा वाजता 45 ते 50 वयाचा अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. त्याबाबतची खबर दत्तात्रय शिंदे रा. गोडोली यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करत आहेत.