वेगवेगळ्या घटनेत दोन जण बेपत्ता
सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनेत दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनेत दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी पहाटेच्या सुमारास गेंडा मला परिसरात राहणारी एक विवाहित राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे अधिक तपास महिला पोलीस हवालदार करपे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 15 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अरविंद हरिबा धनवडे रा. जकातवाडी, ता. सातारा हे राहत्या घरातून त्यांची चारचाकी गाडी घेऊन निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.