अवैध लाकूड मालाच्या वाहतूक प्रकरणी पाच जण ताब्यात
मौजे पिलानी तालुका सातारा व आंबेघर तालुका जावळी या दोन तालुक्यात सातारा वनविभागाच्या फिरत्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये अवैध लाकूड फाटा वाहतूक प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
सातारा : मौजे पिलानी तालुका सातारा व आंबेघर तालुका जावळी या दोन तालुक्यात सातारा वनविभागाच्या फिरत्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये अवैध लाकूड फाटा वाहतूक प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. कारवाई मध्ये दोन बोलेरोचार चाकी वाहनासह सर्व लाकूडफाटा जप्त करण्यात आला आहे.
विभागीय वन अधिकारी कोल्हापूर संजय वाघमोडे व सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश महांगडे वनक्षेत्रपाल वनपाल डीडी बोडके रामेश्वर घुले अश्विनी नागवे प्रकाश वाघ दिनेश नेहरकर यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.
दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता मौजे पिलानी येथे साग जातीच्या लाकूडमलाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार उंब्रजच्या दिशेने जाणाऱ्या या पिकप ला पथकाने अडवले या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या विनापरवाना लाकूड बालाजी वाहतूक होत असल्याची आढळून आले. याप्रकरणी ऋषिकेश सुरेश कदम व 21 राहणार उंब्रज तालुका कराड आमिर आप्पा सुतार वय 60 राहणार कोळशी तालुका कराड यांना ताब्यात घेण्यात आले. असून त्यांच्या विरोधात भारतीय वन अधिनियम 1927 कलम 41 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईमध्ये भरारी पथकाला महाबळेश्वर ते सातारा मार्गावर मेढा गावाच्या परिसरात अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती, महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकप वरोशी केळघर आंबेकर मार्गे मेढा या दिशेने जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने आंबेघर येथे सापळा रचला खैरप्रजातीचा सोल्यु लाकूड म** या मॅक्स मधून जाणार होता. सदरचा लाकूड म** अवैधरित्या विनापरवाना वाहतूक केली म्हणून मारुती निवृत्ती भालेराव व 38 राहणार घोडे तालुका मुळशी जिल्हा पुणे शिवराम लक्ष्मण गोळे वय 50 राहणार उर्वशी तालुका जावळी राजू भुरया वाघमारे वय 40 राहणार कोथळी सोंडेवाडी तालुका महाड जिल्हा सातारा या ठिकाणच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.