सदर बाजार येथून दुचाकीची चोरी
सदर बाजार परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : सदर बाजार परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 ते 5 दरम्यान जितेंद्र नानासो पवार रा. लक्ष्मी टेकडी, सदर बाजार, सातारा यांची घरासमोर पार्क केलेली 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी क्र. एमएच 11 सीवाय 9135 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक सावंत करीत आहेत.