अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
सातार्यात शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी शर्विल बर्गे वय 20 राहणार गोडोली याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : सातार्यात शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी शर्विल बर्गे वय 20 राहणार गोडोली याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. प्राप्त फिर्यादीनुसार अल्पवयीन युवती सातारा शहरातील एका कॉलेजमध्ये शिकावयाला आहे. या युवतीचा शर्विल सातत्याने जून 2024 पासून पाठलाग करत होता. तसेच पोवई नाका भाजी मंडई येथे संबंधिताने या युवतीला छेडण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. कांबळे तपास करत आहेत.