अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा
स्वतःचे अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : स्वतःचे अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढे फाटा येथे हॉटेल साई ढाब्याच्या आडोशाला दि.2 रोजी रात्री 9.30 वाजता राहुल विजय चांदणे (वय 33 रा. कबनूर, कोल्हापूर), वैभव भाऊसो मालगावे (वय30, रा. कबनूर, कोल्हापूर) हे स्वतःचे अस्तित्व लपवून आढळून आल्याने त्यांच्यावर पोलीस कॉन्स्टेबल सुशांत कदम यांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार मेचकर करत आहेत.