वृद्धाचा शॉक लागून मृत्यू
झरेवाडी, पोस्ट करंडी, ता. सातारा येथील वृद्धाला इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागून ते बेशुद्ध झाले. उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. रामराव शिवाजी जाधव वय 58 असे मयत वृद्धाचे नाव आहे. शुभम रामराव जाधव यांनी याबाबतची खबर सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
सातारा : झरेवाडी, पोस्ट करंडी, ता. सातारा येथील वृद्धाला इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागून ते बेशुद्ध झाले. उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. रामराव शिवाजी जाधव वय 58 असे मयत वृद्धाचे नाव आहे. शुभम रामराव जाधव यांनी याबाबतची खबर सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
दिनांक 5 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजता रामराव जाधव हे लघुशंके करता गेले असता लगतच्या इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागून ते बेशुद्ध पडले. उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात त्यांना आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून रात्री एक वाजता ते मयत झाल्याचे जाहीर केले.