महिलेचा विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
महिलेचा विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : महिलेचा विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पतीला फोन करते, त्यांना घरी बोलवते या संशयातून चुलत जावेला अंगावरील कपडे काढून मारहाण करत त्याचा व्हिडीओ बनवल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही मारहाण आईने व मुलाने केली असून विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 13 सप्टेबर रोजी घडली आहे.