तांब्याच्या तारेची चोरी
तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक १२ ते १३ दरम्यान आरफळ, ता. सातारा येथील शेखर दत्तात्रय भोसले यांच्या शेतातील डीपी मधील ७० किलो वजनाची २१ हजार रुपये किंमतीची तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.