दगडाने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
भूविकास चौक येथील पेट्रोलपंप परिसरात एकाने दगडाने मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : भूविकास चौक येथील पेट्रोलपंप परिसरात एकाने दगडाने मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यशवर्धन पवार (वय 25, रा.सातारा) याच्या विरुध्द राजेश दिलीप महामुने (वय 43, रा. एमआयडीसी, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 23 सप्टेबर रोजी घडली आहे. तक्रारदार महामुने हे दुचाकी बाजूला घेत असताना पवार याने अचानक दगडाने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.