अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा
अपघातात दोन जणींना जखमी केल्याप्रकरणी कारचालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात दोन जणींना जखमी केल्याप्रकरणी कारचालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.21 सप्टेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता मीनाक्षी मनोज कुमार क्षीरसागर (वय 50 रा. अपशिंगे, ता. सातारा) या दुचाकीवरून मुलगी आदितीसह साहित्य आणण्याकरता पोवई नाका बाजूने चाललेल्या असताना सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या बंगल्याच्या समोर कारने त्यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. त्यात दोघी जखमी झाल्या. त्यावरून कार चालक ओंकार महादेव पोरे रा.वाठार स्टेशन, ता. कोरेगाव याच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास सातारा शहर पोलीस ठाण्याचे हवालदार कारळे हे करत आहेत.