सातारा तालुका पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
शिवथर गावच्या हद्दीत शिवथर लोणंद जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या रक्ती चिंचेच्या झाडालगत असलेल्या पत्राच्या शेडच्या आडोशाला जुगारावर तालुका पोलिसांनी छापा टाकला आहे.
सातारा : शिवथर गावच्या हद्दीत शिवथर लोणंद जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या रक्ती चिंचेच्या झाडालगत असलेल्या पत्राच्या शेडच्या आडोशाला जुगारावर तालुका पोलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये ९१० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.याप्रकरणी मनोज राजेंद्र गुप्ते (वय २९ राहणार, दिव्यनगरी,सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव अधिक तपास करत आहेत.