मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा
वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सज्जनगड वाहनतळ पार्किंग येथे आनंदराव बाबुराव बैले वय ७० रा. कारी, ता. सातारा यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी अशोक नामदेव मोरे रा. कारी, ता. सातारा यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार कर्णे करीत आहेत.