मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा : मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरगुती कारणावरून आरती सुरज जाधव रा. आंबवडे, ता. सातारा आणि त्यांचे पती सुरज संतोष जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच काजल संतोष जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या तक्रारीनुसार, सुरज संतोष जाधव यांच्याविरोधात दगडाने मारहाण केल्याप्रकरणी काजल संतोष जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे.