अपघात प्रकरणी एसटी चालकावर गुन्हा
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी एसटी चालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी एसटी चालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरात राजवाडा बस स्टॉप समोर दि.13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.10 वाजता पायी चालत जाणारे वसंत दिगंबर गोसावी (वय 82 रा. मंगळवार पेठ) यांना एसटी बस सातारा-कुसवडे हिने धडक दिली. त्यामध्ये ते जखमी झाले. त्यावरून एसटी बस चालक पद्माकर नारायण शेलार (वय 49 रा. म्हसवे), याच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात मिलिंद गोसावी यांनी तक्रार दिली असून अधिक तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक करपे करत आहेत.