मारहाणीसह सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
पोलिसांसमक्ष मारहाण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांनी विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : पोलिसांसमक्ष मारहाण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांनी विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २२ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास समर्थ मंदिर ते बोगदा रस्त्यावर बुलेट क्र. एमएच ११ डीएक्स ९१ वरील राज यादव, सौरभ खरात आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी रिट्झ कार क्र. एमएच १२ एफवाय ९७७७ मधील तीन जणांना पोलीस हवालदार घोरपडे हे तिथे असताना मारहाण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी संबंधित तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत.