गोडोली येथून कारची चोरी
गोडोली परिसरातून अज्ञात चोरट्याने कारची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : गोडोली परिसरातून अज्ञात चोरट्याने कारची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 ते 5 दरम्यान संदीप बाळकृष्ण जाधव रा. यशोदा नगर, गोडोली, सातारा यांची राहत्या घरासमोर पार्क केलेली चार लाख रुपये किंमतीची ईरटीगा गाडी क्र. एमएच 50 ए 6174 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.