कोयना विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाजेगाव येथे वाहतुकीसाठी तयार केलेला पर्यायी मार्ग वाहून गेला आहे. या परिसरात आता मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले.
पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्राधान्याने पाटण येथील प्रशासकीय इमारतीस छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या आठ दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा संबंधित संस्थेवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे थेट निर्देश राज्याचे पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले.
पाटण ते संगमनगर (धक्का) कोयना या रस्त्याची झालेली दुर्दशेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनेनुसार संबंधित ठेकेदार कंपनीकडून तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने बुधवारी दुपारपासून कोयना धरणातून पूर्वेकडे सिंचनासाठी एकूण प्रतिसेकंद 3500 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
दुकानदारांना शंभर व दोनशे, पाचशे रुपयांच्या बनावट नोटा देणार्या एकास व्यापार्यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
अडुळपेठ येथे आज रात्री साडेआठ वाजता मोटारसायकल व ट्रकच्या अपघातात येराड येथील युवक जागीच ठार झाला.
अज्ञाताकडून डोंगरास लावलेली आगीचा वनवा परिसरातील आंब्याच्या बागेत शिरल्याने तो आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या वयोवृद्ध शेतकर्याचा आगीने होरपळून मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील अंब्रुळकरवाडी येथे शुक्रवारी दुपारी घडली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक २ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या योजनेमधून मंजूर टीआर १७ ते सीपीआर ७ जळव ते बामणेवाडी या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाले.