सुशील संसारे यांनी स्वीकारला सातारा गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार
गटविकास अधिकारी, पंचायत समिती सातारा या पदाचा पदभार सुशील संसारे यांनी नुकताच स्वीकारला आहे. त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये प्रभावी कार्य करत प्रशासकीय अनुभव संपादन केला.
सातारा : गटविकास अधिकारी, पंचायत समिती सातारा या पदाचा पदभार सुशील संसारे यांनी नुकताच स्वीकारला आहे. त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये प्रभावी कार्य करत प्रशासकीय अनुभव संपादन केला असून, त्यांच्या साताऱ्यातील नियुक्तीने विकासकामांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी व्यक्त केला आहे.
गटविकास अधिकारी, पंचायत समिती सातारा या पदाचा पदभार सुशील संसारे यांनी नुकताच स्वीकारला आहे. त्याबद्दल त्यांचा याशनी नागराजन यांनी सत्कार केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
भुसावळ (जि. जळगाव) येथील मूळ रहिवासी असलेले संसारे यांनी २०१६ साली गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली. त्यानंतर त्यांनी
२०१६ – परिविक्षाधीन गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिरोळ (जि. कोल्हापूर)
२०१७ ते २०२१ गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळंब (जि. यवतमाळ)
२०२१ ते २०२४ गटविकास अधिकारी, पंचायत समिती कागल (जि. कोल्हापूर)
मार्च २०२४ ते आजअखेर गटविकास अधिकारी, पंचायत समिती पंढरपूर (जि. सोलापूर) अशा विविध ठिकाणी यशस्वीपणे कार्यभार सांभाळला.
त्यांच्या कामकाजातील शिस्त, जनसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांनी प्रत्येक ठिकाणी लोकाभिमुख प्रशासनाची छाप उमटवली आहे. सातारा जिल्ह्यात त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण विकासाच्या नवनवीन संकल्पना आणि प्रकल्पांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.